scorecardresearch

Premium

पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले.

puneshwar mandir pune, masjid, hindu organisations, bjp, agitation, pune municipal corporation
पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच आंदोलन

पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे,पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल नाईक यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी धीरज घाटे यांनी यावेळी केली. ते म्हणाले की या मागणीसाठी आजपर्यंत प्रशासनासोबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Nitin Gadkari Khasdar Mahotsav Vidarbha
नितीन गडकरींच्या खासदार औद्योगिक महोत्सवावरून विदर्भवादी का भडकले?
mbmc started demolishing unauthorized structures in naya nagar under huge police protection
गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मीरा रोडमध्ये पालिकेची कारवाई, नयानगरमधील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात
Procession in Nagpur
नागपुरात घरोघरी भगवे ध्वज, रांगोळ्या, तोरण अन् मिरवणुकांमध्ये ‘जय श्री राम’चा गजर
kalyan dombivli school students, celebrated shri ram temple opening ceremony
डोंबिवली, कल्याणमध्ये ‘रामोत्सव’, दीपोत्सव; विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, राम नामाचा गजर

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Movement of hindu organizations in pune municipal corporation to demand removal of encroachment of mosque in puneeshwar temple area svk 88 amy

First published on: 21-08-2023 at 15:56 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×