पुणे : मुंबई मध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे पुण्यामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून सारसबाग येथे शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, यांच्या सह सर्व अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सारसबाग येथे झालेल्या मानवंदनेनंतर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी याकरीता चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 2611 terror attack martyrs tribute by pune police band drawing competition pune tmb 01 svk
First published on: 26-11-2022 at 11:39 IST