पुणे : महसूल विभागाच्या ई-फे रफार प्रकल्पांतर्गत डिजिटल मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात मुंबई उपनगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. ही सुविधा या वर्षी २१ जानेवारीपासून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातून ३३ हजार मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत डिजिटल मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिगर शेतजमीन असलेल्या विभागात स्थावर मिळकत म्हणजेच जमीनजुमला किं वा मालमत्तेची शासनाच्या भूमापन विभागाच्या दप्तरी असलेली नोंद तसेच कायदेशीर आणि अधिकृत मालकी व क्षेत्रफळ दर्शवणारा, नगरभूमापन अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह देण्यात येणारा शासकीय दस्तऐवज म्हणजेच मिळकत पत्रिका. राज्य शासनाकडून महाभूमी संकेस्थळावरून २०१९ पासून डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा, १ ऑगस्ट २०२० पासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा (आठ-अ) आणि २१ जानेवारी २०२१ पासून डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध भागातून डिजिटल अभिलेख डाउनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे.

डाउनलोड कसे कराल?

bhulekh.mahabhumi.gov.in  या शासकीय संके तस्थळावर गेल्यानंतर ‘डिजिटली साइन्ड सातबारा’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर गेल्यानंतर लॉगइन करावे लागेल. सातबारा काढताना वापरलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकू न लॉगइन करता येईल. किंवा मोबाइल क्रमांक नोंदवूनही ओटीपी बेस्ड लॉगइन पर्याय उपलब्ध आहे. त्यानंतर डिजिटली साइन्ड प्रॉपर्टी कार्ड हा पर्याय निवडावा. या पर्यायात गेल्यानंतर जिल्हा, गाव किं वा मिळकत ज्या तहसील अंतर्गत येते ते कार्यालय निवडावे, त्यानंतर सिटी सर्व्हे क्रमांक किंवा भूखंड क्रमांक नोंदवावा.

ई-फे रफार प्रकल्पांतर्गत डिजिटल मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा असून या जिल्ह्यातून १२ हजार आणि पुणे जिल्ह्यातून सात हजार मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात आल्या आहेत. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारा आणि मिळकत पत्रिका असे विविध प्रकारचे तब्बल एक कोटी एक लाख अभिलेख नागरिकांनी डाउनलोड के ले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत राज्य शासनाला १६ कोटी चार लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

                – रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai suburbs in top to download digital property cards zws
First published on: 21-07-2021 at 03:25 IST