अल्पवयीन युवतीशी प्रेम विवाह केल्यानंतर कौटुंबिक वादातून तिचा गळा दाबून तरुणाने खून केल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी तरुणास विमानतळ पोलिसांनी अटक केली. संजना उदय मकदूम (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या अल्पवयीन युवतीचे नाव आहे. या प्रकरणी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. संजनाची आई सुवर्णा यांनी या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग

आरोपी चेतनला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चेतन आणि संजना यांची ओळख होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक नोव्हेंबर २०१८ रोजी पळवून नेले होते. याबाबत संजनाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी चेतनला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालायाने त्याला नुकताच जामीन मंजूर केला होता. त्यानंतर चेतनने संजनाला पुन्हा पळवून नेले. तिच्याशी विवाह केला.

हेही वाचा >>>पुणे: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणावर हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघे जण लोहगावमधील निंबाळकरनगर परिसरात राहत होते. चेतनने संजनाचा छळ सुरू केला. दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्याने संजनाला बेदम मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केला. सहायक पोलीस निरीक्षक रत्ना सपकाळे तपास करत आहेत.