कुटुंबातील सदस्यांना त्रास देतो म्हणून वडिलांनीच केला तरूण मुलाचा खून ; मोशी येथील घटना, वडिल गजाआड

संपूर्ण कुटुंबाला सतत त्रास देतो आणि वेळप्रसंगी मारहाणही करतो, म्हणून वडिलांनीच तरूण मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे उघडकीस आली आहे.

CRIME AND ARREST
( संग्रहित छायचित्र )

पिंपरी: संपूर्ण कुटुंबाला सतत त्रास देतो आणि वेळप्रसंगी मारहाणही करतो, म्हणून वडिलांनीच तरूण मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे उघडकीस आली आहे.

युवराज अशोक सावले (वय-२२, रा. जुन्या जकात नाक्याजवळ, मोशी) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अशोक शिवाजीराव सावले (वय-४९, रा. मोशी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जूनला पहाटे तीनच्या सुमारास युवराजच्या डोळ्यात सर्वप्रथम मिरची पूड टाकण्यात आली.

त्यानंतर, धारदार शस्त्राने तसेच लोखंडी पाईपने डोक्यात घाव घालून त्याचा खून करण्यात आला. युवराज हा घरातील सदस्यांना नेहमी त्रास देत होता. त्याचप्रमाणे, मारहाणही करत होता. त्यामुळे वैतागून वडिलांनी मुलाचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder young boy father harasses family members incident moshi arrest pune print news amy

Next Story
पुणे : ‘शिवछत्रपतींचा वारसा-स्वराज्य ते साम्राज्य’चे उद्या सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी