पुणे : चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून खून ; वाघोली परिसरातील घटना | Murdered by neighbors for not bringing chicken pune print news amy 95 | Loksatta

पुणे : चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून खून ; वाघोली परिसरातील घटना

चिकन न आणल्याने शेजाऱ्यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली.

पुणे : चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून खून ; वाघोली परिसरातील घटना
( संग्रहित छायचित्र )

चिकन न आणल्याने शेजाऱ्यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात लोणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर नायक (वय ३५, सध्या रा. रानवारा हॅाटेलसमोर, वाडेबोल्हाई-केसनंद रस्ता, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शेजारी विकास भोसले, कविता भोसले, बल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायक यांची पत्नी मेहबू यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नायक आणि आरोपी भोसले दाम्पत्य शेजारी आहेत. नायक यांना आरोपींनी चिकन आणण्यास सांगितले होते. चिकन न आणल्याने आरोपी नायक यांच्यावर चिडले. नायक यांची पत्नी मेहबू आणि मुलीला आरोपींनी मारहाण करुन शिवीगाळ केली.

भांडणात शंकर नायक यांनी मध्यस्थी केली. त्या वेळी आरोपी विकास भोसले आणि साथीदारांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : कोरेगाव पार्कमधील पुलावरुन नदीपात्रात मारली उडी ; अग्निशमन दलाकडून शोधमोहिम

संबंधित बातम्या

पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व
पुणे: अकरावीच्या ३३ हजारांहून अधिक जागा रिक्त; प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण
‘राज्यपाल हटाव’च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक, अजित पवार म्हणाले, “कोश्यारी खासगीत म्हणतात…”
पुणे: म्हाळुंगे-माण योजना, विद्यापीठ चौक उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारकडून १०५ कोटींचा निधी मंजूर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: “अंघोळ घालतेय राखी सावंत…” ड्रामा क्वीनने फ्लर्ट केल्यानंतर जागा झाला प्रसाद जवादेमधील रॅपर; घरातील सदस्यांनाही हसू अनावर
मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याने अजित पवारांचा हल्लाबोल, म्हणाले “तक्रार काय करता? त्यांच्या अरे ला कारे…”
“आता मला कामं मिळणंही बंद झालंय, कारण…”; स्वरा भास्करने व्यक्त केली खंत
पुणे : मराठी बालकुमार साहित्य संस्थेमध्ये फूट; शाखांचा संस्थेपासून वेगळे होण्याचा पवित्रा
“जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह, कारण…”, डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देत माजी न्यायमूर्ती हेमंत गोखलेंचं विधान