scorecardresearch

Premium

पुणे लोकसभा प्रियांका गांधी लढणार का? नाना पटोले म्हणाले, “हायकमांड…”

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधीदेखील पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Nana patole open up on Will Priyanka Gandhi contest in Pune Lok Sabha
प्रियांका गांधी पुणे लोकसभा निवडणुक लढणार का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

पुणे: मागील काही दिवसापूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुक लढविणार अशी चर्चा सुरू होती. ती चर्चा थांबत नाही तोवर काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधीदेखील पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली. या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यात काँग्रेस पक्षाची पाश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रियांका गांधी पुणे लोकसभा निवडणुक लढणार का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला असता त्यांनी, आपण त्यांना पत्र पाठवून द्या अशी मिश्किलपणे टिप्पणी करताच एकच हशा पिकला. तर याबाबत हाय कमांड निर्णय घेईल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

तसेच यावेळी नाना पटोले म्हणाले की,आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेऊन विभागीय निहाय बैठका आयोजित केल्या आहेत. त्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्हाला आगामी निवडणुकीत यश निश्चित मिळेल. त्याच बरोबर आम्ही जागावाटपासंदर्भात मेरिटनुसार निर्णय घेणार असून पश्चिम महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

congress leaders, remembering Vilasrao deshmukh
‘साहेब’ तुम्ही हवे होतात…पडझडीच्या काळात काँग्रेस नेत्यांना विलासरावांची आठवण
Kamal nath to joiN bjp
कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
Former Maharashtra CM Ashok Chavan
भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत, तरीही मौन! दोन दिवसांत भूमिका स्पष्ट अशोक चव्हाण
karti chidambaram
कार्ती चिदंबरम यांना शिवगंगा मतदारसंघातून हटवण्याची मोहीम; अनेक नेते नाराज, तमिळनाडू काँग्रेसमध्येही पडणार फूट?

आणखी वाचा-काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले

तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुक होत नाही. राज्य सरकार आणि प्रशासक कारभार पाहत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. पण आगामी निवडणुका कधी ही झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारला जनता निश्चित जागा दाखवेल, तर राहुल गांधींना भाजप रावण म्हणून उल्लेख करत आहे. पण महागाई, बेरोजगारी कुणी वाढवली. तर रावण प्रवृत्तीच्या केंद्र आणि राज्य सरकारने वाढवली आहे. त्यामुळे या रावण प्रवृत्तीच्या सरकाराच दहन करायचं आहे. अशा शब्दात केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole open up on will priyanka gandhi contest in pune lok sabha election svk 88 mrj

First published on: 08-10-2023 at 16:02 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×