राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पुण्यात हजेरी लावली. सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन त्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंच्या एका विधानाने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सूत्रसंचालन करत असताना माझा उल्लेख केंद्रीय मंत्री म्हणून होत असतो. राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत, असं सांगितलं जातं. पण व्हाया देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगितलं जातं की दिल्लीला जा आणि सुखी राहा. आम्ही आदेश पाळला आणि भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात. मीही आदेश पाळला आणि आज मी सुखी आहे.

हेही वाचा – “मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?”; नारायण राणेंचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीसांना उद्देशून बोलत असताना राणे म्हणाले, चार महिन्यात आठ ते नऊ राज्यं फिरत आज पुण्यात आलोय. दर महिन्याला येणारा माणूस चार महिन्याने आलाय. तुमच्या आणि माझ्यातलं अंतर वाढवणारे हे आहेत. राणे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहत हात जोडले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिम्बायोसिस विद्यापीठाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.