लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कोंढवा भागात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाने एका सोसायटीत छापा टाकून एकास ताब्यात घेतले.

जुबेर महंमद शेख (वय ३९, रा. कोंढवा ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या (आयबी) पथकाने कोंढव्यातील वजीर कॅस्केड सोसायटीत कारवाई केली. जुबेरला याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली.

आणखी वाचा-स्वस्तात ऑनलाइन उत्पादने खरेदीचा मोह अंगलट; व्यावसायिकाची १ कोटी २१ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुबेर याच्यावर कारवाई का करण्यात आली, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकले नाही. एनआयए आणि आयबीच्या पथकाने ही कारवाई करताना कमालीची गोपनीयता बाळगली होती. दहशतवादी कृत्यात सामील असल्याच्या संशयावरुन एनआयएने यापूर्वी कारवाई केली होती. दहशतवादी कृत्यासाठी एका इमारतीतील खोलीचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएच्या पथकाने खोली लाखबंद (सील) केली होती.