महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा या तीन परीक्षांसाठी वर्णनात्मक स्वरुपाचा नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम २०२३मध्ये आयोजित परीक्षांपासून लागू केला जाणार आहे. 

हेही वाचा >>> पुणे : सीटीईटी उमेदवारांना अभियोग्यता चाचणीची संधी; कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षेअंतर्गत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठीचे सुधारित अभ्यासक्रम एमपीएससीने प्रसिद्ध केला आहे. त्यात अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम २४ जानेवारीला, तर कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी २०२३मध्ये होणाऱ्या परीक्षांपासून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.