scorecardresearch

Premium

पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, पादचारी दिन म्हणजे शोकदिन, पुणे महापालिकेच्या उपक्रमावर स्वयंसेवी संस्थांची टीका

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे

pune municipal corporation
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी वर्षातून एकदा पादचारी दिन आयोजित करून महापालिका केवळ वार्षिक आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र प्रत्यक्षात पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने पादचारी दिन हा पादचाऱ्यांसाठी शोकदिन असल्याची टीका ‘पादचारी प्रथम’ संस्थेने केली आहे.

हेही वाचा >>> पादचारी दिनानिमित्त पीएमपीच्या आज जादा गाड्या; दर तीस मिनिटांला गाडी, पीएमपीच्या संचलनात बदल

old pension
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा नवा निर्धार, नागपूर ते मुंबई संकल्प यात्रेला सुरुवात
Sindhi refugees in Sion Koliwada
सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा म्हाडामार्फत पुनर्विकास!
Jalgaon people morcha
या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा
rs 100 for per tonne of sugarcane to pay immediately to farmers demand by swabhimani shetkari saghtana
कोल्हापूर: ऊसाला प्रति टन १०० रुपये द्या अन्यथा साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकणार; ‘स्वाभिमानी’चा इशारा

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पादचारी प्रथम या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत इनामदार यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. महापालिकेने पादचारी धोरण आणि शहरी मार्ग मार्गदर्शक धोरण यापूर्वीच स्वीकारले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी काय करणे अपेक्षित आहे, याची जाणीव महापालिकेला आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि रस्त्यांच्या योग्य रचनेसह या धोरणाची अंमलबजावणी केली असती तर आज परिस्थिती वेगळी दिसली असती. पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची वस्तुस्थिती आहे. महापालिका केवळ रस्ते करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जात असून पदपथ अरूंद केले जात आहेत. पादचारी सिग्नलचा वेळ कमी करण्यात आला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची तडजोड करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा साजरा होणारा पादचारी दिन हा पादचाऱ्यांसाठी शोकदिन आहे, असे या निवेदनात इनामदार यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ngp s criticized pune municipal corporation for celebrating pedestrian day pune print news apk13 zws

First published on: 10-12-2023 at 22:14 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×