पुणे : पुणे, मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडविण्याच्या प्रकरणात फरारी असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) लखनौतून अटक केली. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

रिजवान अली उर्फ सामी अली उर्फ अबूल सलीना उर्फ दानिश असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रिजवान मूळचा दिल्लीतील दर्यागंज भागातील आहे. कोथरूड भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने २०२३ मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात दोघांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना दोघे जण देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. दोघे जण पुण्यातील कोंढव्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी कोंढव्यातील घरावर छापा टाकला. तेव्हा तेथून बाॅम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच, शहरातील संरक्षण विषयक संस्थांची महिती असणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) करण्यात येत होता. संबंधित तपास त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता.

‘एनआयए’ने तपास सुरू केला, तेव्हा ‘आयएस’चे संशयित पुणे, मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. ‘आसएस’च्या दहशतवादी कारवाईत तरुणांना ओढण्याचे काम संशयित करीत असल्याची माहिती तपासात मिळाली. या प्रकरणात पुण्यातील डाॅॅक्टरसह ११ जणांविरुद्ध ‘एनआयए’ने गुन्हा दाखल केला होता.

गु्न्हा दाखल झाल्यानंतर रिजवान अली पसार झाला होता. ‘एनआयए’च्या माहितीनुसार, आयईडी स्फोटके तयार करण्याचे आणि गोळीबाराचे प्रशिक्षणही देण्यात त्याचा सहभाग होता. त्याला पुण्यातील घातपात कारवाई प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती ‘एनआयए’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महंमद इम्रान खान, महंमद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बोराडावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन, शहानवाझ आलम, अब्दुल्ला फैयाझ शेख आणि ताल्हा खान अशी इतर १० आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर ‘एनआयए’ने ‘यूएपीए’अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.