मागील काही काळापासून देशात महागाई वाढतच चालली आहे. इंधानाचे दर गगनाला भीडत असताना, खाद्य पदार्थ्यांच्या महागाई दराने सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. यानंतर आता चपाती किंवा भाकरी यासाठी आवश्यक असणारं पीठही महाग होणार आहे.

देशात वाढलेली महागाई, विजेच्या दरात झालेली वाढ आणि पीठ गिरणी साहित्याच्या दरामध्ये झालेली वाढ याचा विचार करून दळणाच्या दरामध्ये प्रतिकिलो एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. एक जूनपासून प्रतिकिलो दळणासाठी आठ रुपये आकारण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी ही माहिती दिली. संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये दळणाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दळणाचा दर प्रतिकिलो सात रुपये होता. त्यामध्ये एक रुपयाची वाढ करून तो आता आठ रुपये करण्यात आला आहे. या सभेस संघाचे सचिव प्रकाश कर्डिले, दिलीप रणनवरे, अमोल मेमाणे, प्रवीण बारमुख, प्रमोद वालेकर, गणेश गोरे, राजू चांदेकर, सुरेश वाळके आणि शिवाजी ठकार उपस्थित होते.