पुणे : अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या फटक्यामुळे ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यानंतर आता अ‍ॅमेझॉन डेव्हलपमेंट सेंटरने पुण्यात मोठी जागा भाड्याने घेतल्याचे समोर आले आहे.

अ‍ॅमेझॉनने पुण्यात डेटा सेंटर सुरू करण्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. अ‍ॅमेझॉनसारखी जागतिक स्तरावरील मोठी कंपनी पुण्यात कार्यालय सुरू करणार असल्याने रोजगार निर्मिती होणार असल्याने उद्योग क्षेत्रात उत्साह निर्माण झाला होता. त्यानुसार खराडी येथील माहिती तंत्रज्ञान स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये प्रकल्पात खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून सुमारे २ लाख चौरस फूट जागा घेतल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश, आदेशाचा भंग केल्यास कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पुणे : कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले निरीक्षणगृहातून पसार, येरवड्यातील घटना

गेल्या काही महिन्यांत बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीचा मोठा फटका अ‍ॅमेझॉनला बसला आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता पुण्यातील कार्यालयाची जागा भाड्याने घेण्यात आल्याचे समजते.