इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण गावातील मदनवाडी चौकातील पुलावरून अवजड कंटेनर कोसळून कंटेनर चालक जागीच ठार झाला.ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या पुलाखालून बारामती – अहिल्यानगर मार्ग जातो .व पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुलावरून होते. हा कंटेनर सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने चालला होता. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने सेवा रस्त्यावर वीस फूट उंचीवरून तो खाली कोसळला. या अपघातात कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.

अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला. सकाळी अपघात झाल्याने रहदारी कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. या अपघातात श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव, वय ३७ वर्षे, रा. मुंबई मूळ उत्तर प्रदेश हा चालक ठार झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महांगडे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस कुमक पाठवून बचावकार्य सुरू करून कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला होता.

दरम्यान पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व प्रवाशांचा जीव अक्षरशः ‘रामभरोसे’ झाला आहे . भिगवण ,इंदापूर दरम्यान अनेक चढ उतार व राष्ट्रीय महामार्गावर उजनी पाणलोट क्षेत्र लगत मोठे पूल आहेत. रात्रंदिवस या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते. या रस्त्याला अनेक चढ-उतार असल्याने आपसूकच वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो .भरघाव वेगाने वाहने जात असल्याने अनेक वेळा भीषण अपघात या मार्गावर वारंवार घडतात.

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव , पळसदेव, काळेवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये चिकन सेंटर मधील घाण कचरा आणून टाकला जातो. तेथे कचऱ्याचे ढीग असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे .रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . कुत्री या घाणीवर फिरत असल्याने अपघाताचा ही धोका संभवतो.या महामार्गावर डाळज येथे वाहतूक पोलीस मदत केंद्र आहे .पोलिसांची गाडी सातत्याने या रस्त्यावर फिरते. मात्र भरगाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना कॅमेऱ्याद्वारे पकडून दंडात्मक चलन पाठवले जाते .परंतु कारवाई होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अति वेगाने जाणारी वाहने, हाच मोठा गंभीर प्रश्न या मार्गावर आहे. इंदापूर नजीकच्या बाह्यवळण महामार्गावर गेले अनेक दिवस रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे .त्या ठिकाणी मोठे काम सुरू असून गेले कित्येक महिने हे काम सुरू आहे .त्या ठिकाणीही रहदारी सातत्याने खोळंबत असते. या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अनेक मोर्‍यांना अद्यापही कढनडेच बसवले नसल्याने तिथेही अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला. आहे काळेवाडी नजीक काही मोर्‍यांना कठडेच बांधले नसल्याने त्या ठिकाणी अपघाताचा संभव आहे. अशा अनेक त्रुटी राष्ट्रीय महामार्गावर आढळून येत असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने देखभाल व दुरुस्ती करावी .अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.