शिरूर : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आज डॉ,धनंजय भिसे यांचे ‘मराठी मायबोली’ या विषयावर विशेष व्याख्यान येथील चां. ता. बोरा महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते .

भिसे यांनी व्याख्यानात मराठीची ‘संत साहित्य ते आधुनिक साहित्य ‘अशी भव्य लेखन परंपरा ओघवत्या व दमदार भाषेत कथन केली. शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याचा विशेष आढावा घेतला.तसेच या निमित्ताने सतीश पेंढरकर (वय -७६) यांचे साहित्यिकांच्या हस्ताक्षर -संदेश यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते पेंढरकर हे मुळचे कराड येथील.वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी लेखकांची पहिली स्वाक्षरी संदेश मिळवला. त्यानंतर शेकडो लेखकांना भेटून त्यांनी हा संग्रह केला आहे. ते कोणत्याही महाविद्यालयात व शाळेत हे प्रदर्शन भरवत असतात. रसायनशास्त्र मध्ये पदवी प्राप्त केल्यावर ते आर्मीच्या अकाऊंट खात्यात नोकरीला लागले .पुण्याजवळच्या दिघी येथील आर्मी कार्यालयात ते नोकरीला होते, पुण्याला जवळ असल्याने साहित्यिक -लेखक यांचा सहवास मिळाला आणि त्यांच्या या छंदाला चालना मिळाली, शिवाय दुर्मिळ ग्रंथ झेराॕक्स किंवा मूळ उपलब्ध करून ते वाचाकाना देत असतात, त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च ते घेत नाहीत चां.ता. बोरा महाविद्यालय मराठी विभागातर्फे त्यांच्या या दुर्मिळ हस्ताक्षर -संदेश स्वाक्षरी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळकृष्ण लळीत.डॉ. राजाभाऊ भैलुमे व डॉ. क्रांती पैठणकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, के. सी. मोहिते यांच्या हस्ते त्यांचा व डॉ.धनंजय भिसे यांचा यानिमित्ताने सन्मस्न करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक ,विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला व प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.