शिरूर: मोटार सायकलला टेंम्पोने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला . तर दोन जण जखमी झाले आहेत . करणसिंग ग्यारसिंग जमरे वय ४९ वर्ष, रा. , जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून टिकम जमरे व  गेंदालाल जमरे हे दोघे जखमी झाले आहेत .

या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  हा अपघात  11मार्च 2025 रोजी सव्वाबाराचा  सुमारास झाला . याबाबत  रोहन अजित सरनोत, वय -३८  वर्ष, व्यवसाय, कॉन्टॅक्टर, रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे यांनी  अज्ञात टेंम्पो वरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे येथे  अज्ञात टेंम्पोचा चालकाने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात  टेंम्पो चालवून समोरून येत असलेल्या  हिरो कंपनीची मोटरसायकल गाडी नं. एम. पी. ४६ झेड ए. ३९०१  ला  धडक दिली . त्यात टिकम जमरे यास गंभीर दुखापत झाली .  त्याच्यावर  पुणे येथे उपचार सुरु आहेत तर  गेंदालाल जमरे यास किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात  करणसिंग ग्यारसिंग जमरे वय ४९ वर्ष रा.  जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश याना गंभीर व किरकोळ दुखापत होवून  ते मरण पावले  .टेंपो वाहनचालक अपघाताची खबर न देता पळुन गेला आहे. या संदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक  फौजदार  कदम करत आहे .