लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बेपत्ता झालेल्या महिला, मुलांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविली जाणार आहे. देशभरातील १२ राज्यांत १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.

आणखी वाचा-अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजीत तावरेंची निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत हरवलेली मुले, महिलांचा शोध घेण्यात येणार आहे. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील तपास पथकांना अपहृत मुले, महिलांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पथकाकडून मुले, तसेच महिलांचा शोध घेण्यात येणार आहे.