पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले देशमुख यांची नुकतीच पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात बदली झाली. देशमुख यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी दिला.

पंकज देशमुख यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेत, तसेच परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.शहर पोलीस दलात बदली झालेले राजेश बनसाेडे यांची पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनसोडे यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. नागपूर पोलीस दलातून बदलून आलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची प्रशासन विभागात नियुक्ती करण्याचा आदेश देण्यात आला आहे.