पिंपरी : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची आज बदली झाली आहे. शेखर सिंह हे ऑगस्ट २०२२ मध्ये पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक घडामोडी घडल्या. चिखली येथील अनधिकृत बांधकाम आणि भंगाराची गोदाम जमीनदोस्त करण्यात आयुक्त शेखर सिंह यांचा मोठा हातभार होता.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे मावळते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बदली नाशिक येथे झाली आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. सध्या पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त म्हणून पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे.

श्रावण हर्डीकर यांना पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचा अनुभव आहे. ते याआधी महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले आहेत. शेखर सिंह हे ‘पीएमआरडीए’ साठी प्रयत्नशील होते. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आलं आहे. थेट नाशिक येथे त्यांची बदली झाल्यामुळे ते नाराज झाले असल्याच बोललं जात आहे.

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर हे भाजप पक्षातील बड्या नेत्यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच श्रावण हर्डीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवल्याचे बोलले जात आहे.