पुणे: जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांतेतमध्ये मतदान झाले. निवडणुकीसाठी १ हजार २२९ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ७१ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान मुळशीमध्ये ७९ टक्के झाले आहे. भोरमध्ये ७८ टक्के तर दौंड आणि जुन्नरमध्ये ७६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील १२ तालुक्‍यातील १७६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ३ लाख ३ हजर ५८९ मतदार आहेत. त्यापैकी रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २ लाख १४ हजार ३२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानासाठी मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी झाली होती. सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी  साडेपाच वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. दुपारी साडेतीन पर्यंत ७१ टक्के मतदानाचा हक्क बजावला, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.

42 gangster tadipaar from pune city
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातील ४२ गुंड तडीपार
Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

वेल्हे तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी ७२.३४ टक्के, भोर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी ७७.७० टक्के, दौंड तालुक्यातील आठ ग्रापंचायतीसाठी ७१.९१ टक्के, बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ७५.५६ टक्के, इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसांठी ७३.३० टक्के मतदान झाले. तर जुन्नर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७५.०५, आंबेगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसांठी ६४.९८ टक्के, खेडमधील २१ ग्रामपंचायतींसाठी ६३.९३ टक्के, शिरूरमधील ४ ग्रामपंचायतींसाठी ६५.३९ टक्के मतदान दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाले. तसेच मावळ मधील ८ ग्रामपंचायतींसाठी ६८.२४, मुळशीतील ५ ग्रामपंचायतींसाठी ७८.३२ तर हवेली तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी ६६.७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.