पुणे : गणेशोत्सवातील धडकी भरविणारा डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या लेझर बीमच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वाडेश्वर कट्ट्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, सतीश देसाई आणि भाजपाचे माजी सभागृह नेते उज्ज्वल केसकर यांनी अ‍ॅड. श्रीकांत शिरोळे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा सलग दुसऱ्या वर्षी ध्वनिपातळीने शंभरी पार केली. पोलिसांनी निर्बंध घालूनही मिरवणुकीत त्याचे पालन झाले नाही. वाढलेल्या ध्वनिपातळीचा त्रास झाल्याबाबत पुणेकरांकडून समाजमाध्यमांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच राजकीय पक्षांनी भूमिका घेत निर्बंध लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. संस्कृतीचे पालन करताना सामाजिक भान हवेच, अशी भूमिका याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘पीएमसी केअर’चा पुणेरी कारभार; छोटा दगड काढून, ठेवला मोठा दगड

हेही वाचा – एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका; ११ लाखांची वसुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवातील आणि प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा धडकी भरविणारा दणदणाट, ढोल-ताशा पथकांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि मिरवणुकीत लेझरच्या वापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात डीजे आणि लेझर बीमच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असून, त्यानंतर ढोल-ताशा पथकांसंदर्भात याचिका दाखल करण्यात येईल, असे काकडे यांनी स्पष्ट केले. डीजे आणि लेझरच्या वापराबाबत निर्बंध हवेत, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.