पिंपरी- चिंचवड: दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून तरुणीची वाढदिवसाच्या दिवशी प्रियकराने हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. काही वर्षांपूर्वी आरोपी दिलावर सिंगने मेरी ला जीवे मारण्याची धमकी दिली होती. असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मेरी मानसिक तणावात होती. यातून हे सर्व घडलं असल्याचा आरोप मेरीच्या कुटुंबीयांनी केला. मेरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. ते थांबवावे अशी विनंती देखील कुटुंबीयांनी केली आहे.
मेरीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मेरी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली. नेहमीप्रमाणे बराच वेळ तीच कुटुंबियांसोबत व्हाट्स चॅटिंग सुरू होत. परंतु, दुपारी ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत फोन लावला, परंतु फोन बंद येत होता. अखेर देहूरोड पोलीस ठाण्यात मेरीची बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर मेरीची हत्या झाल्याचं समोर आलं. चार वर्षांपूर्वी मेरी डिमार्टमध्ये काम करत होती. तेव्हा दिलावर सिंग आणि मेरी ची ओळख झाली. दिलावर मेरी ला मानसिक त्रास देत होता. मेरीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याची गाडी फोडली होती. अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. आरोपी नराधम दिलावर सिंग ला आमच्या स्वाधीन करा, आम्ही आमचा न्याय करू. अशी संतप्त प्रतिक्रिया मेरीच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
शुक्रवारी लॉजवर मेरीची हत्या
शुक्रवारी मेरीचा वाढदिवस होता. दिलावर सिंग ने तिला काळखडक येथील लॉजवर बोलावलं. मेरीच दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय दिलावर ला आधीच होता. दिलावर ने आणलेला केक दोघांनी कापला. मग, मेरीच्या मोबाईलमधील काही आक्षेपार्ह फोटो बघून चिडलेल्या दिलावरने गळ्यावर चाकूने आणि ब्लेडने वार करून मेरीची हत्या केली.
देहूरोड पोलीस काय म्हणतात?
मेरीच्या मोबाईलमधील तिचे आणि दुसऱ्या प्रियकराची आक्षेपार्ह फोटो बघून हत्या केली. अशी कबुली दिलावर सिंगने पोलिसांना दिली आहे. परंतु, दिलावरने मेरीचा मोबाईल फोडला आहे. मोबाईलचा डिस्प्ले फोडला आहे. मोबाईलमध्ये खरच तसे फोटो आहेत का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत फॉरेन्सिकचा रिझल्ट आल्यानंतर स्पष्ट होईल.