पिंपरी-चिंचवड : वायु प्रदूषण हे सगळ्यांसाठीच घातक आहे. या संदर्भात न्यायालयाने आणि शासनाने जे निर्देश दिले आहेत त्यांचे तंतोतंत पालन विविध ठिकाणी केले जात असले तरी दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वायु प्रदूषणाने डोके वर काढले आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील हवामान शुद्ध कसे राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच वायू प्रदूषण ज्या- ज्या माध्यमातून होत आहे, त्या माध्यमांचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे. दीपावलीनिमित्त घराघरात लक्ष्मीपूजन हे मोठ्या उत्साहात आणि फटाके फोडून करण्यात आले आणि याचाच फटका वायु प्रदूषणाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांना बसला आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड : कुरघोड्या, राजकीय डाव करणारे नेते एकाच मंचावर, नेत्यांमध्ये रंगल्या गप्पागोष्टी

हेही वाचा : फटाक्यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवडची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीमध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी महानगरपालिका अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, वायु प्रदूषण संदर्भात न्यायालयाने आणि सरकारने जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका कारवाई करत आहे. महानगरपालिका प्रभाग निहाय वायु प्रदूषण नियंत्रण पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करून नियमांचे पालन केले जात आहे का? हे पाहिले जात आहे. नियमांची पायमल्ली केल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोशल मीडिया आणि प्रसिद्धी पत्रकांद्वारे वायु प्रदूषण कमी करण्याबाबत महानगरपालिका प्रयत्न करत आहे. वायु प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यास धोका होऊ शकतो. वायु प्रदूषण ज्या- ज्या माध्यमातून होत आहे. त्या माध्यमांचा वापर कमीत कमी करावा, शक्यतो टाळावा. शहरातील हवामान कसं शुद्ध राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे किरण गायकवाड यांनी म्हटले आहे.