पुणे: नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हवा बिघडली आहे. सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार पुण्याची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रदूषणामुळे हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे जमिनीवर राहणारे धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. वाहनांचा धूर, बांधकामे, फटाके यामुळे त्यात भर पडते. गेल्या काही दिवसांत मुंबईप्रमाणेच पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकातील आकडेवारीतून दिसून आले होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले. त्याशिवाय वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या.

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!

हेही वाचा… महापालिकेच्या कचरा संकलन गाडीवरील कामगार निघाले लुटारू… शहरात अशी केली लुटमार!

दिवाळीचा सण ९ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यावर फटाके उडवण्यास सुरुवात झाली. रविवारी नरक चतुर्दशी असल्याने पहाटेपासूनच फटाके उडवण्यास सुरुवात झाली. दिवसभर शहरात ठिकठिकाणी फटाके उडवणे सुरूच होते. तर सायंकाळी लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आले. त्यात बॉम्ब, माळांसारख्या आवाजी फटाक्यांसह आकाशात फुटणाऱ्या रोषणाईच्या फटाक्यांचाही समावेश होता. त्यामुळे प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून आले. शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू राहिल्याने हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली आहे.

हेही वाचा… VIDEO: फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रामुख्याने शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, कोथरूड, भूमकर चौक, भोसरी, निगडी, आळंदी या भागांतील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात बिघडली आहे. हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे श्वसनाला त्रास होणे, धाप लागणे, दम लागणे अशा आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अस्थमासारखा आजार असलेल्यांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.