पिंपरी : सैनिकांना वंदन उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी स्वातंत्र्यसैनिक, शहिदांच्या कुटुंबातील सदस्य, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकांसाठी योजना तयार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती नेमण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २० स्वातंत्रसैनिक, नऊ शहिदांची कुटुंबे आणि सुमारे १५०० आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत. कार्यरत सैनिकांपैकी अनेकांची कुटुंबे महापालिका हद्दीत वास्तव्य करतात. स्वातंत्र्यसैनिक, शहीद, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकांसाठी योजना तयार करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ११ जणांची समितीही नेमण्यात आली आहे.

हेही वाचा : पिंपरीतील पाच हजार फेरीवाल्यांची कागदपत्रे जमा करण्याकडे पाठ

स्वातंत्र्यसैनिक, शहिदांचे कुटुंबीय, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी पालिका मुख्यालय स्तरावर तसेच आठ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर प्रत्येक महिन्याचे तक्रार अर्ज स्वीकारणे व समस्या जाणून घेऊन कार्यवाही करणे, या उपक्रमाच्या कामकाजाचे समन्वय करणे, समितीच्या बैठकांचे नियोजन करावे. दर तीन महिन्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा कक्ष प्रमुखांनी घ्यावा. पालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये स्वातंत्रसैनिक, शहीद, माजी सैनिक यांच्यासाठी राबवावयाच्या विविध योजनांसाठी तरतूद स्वतंत्र लेखाशीर्षाखाली अंदाजपत्रकात करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा विभाग यांच्याकडे संबंधित विभागप्रमुखांची महिन्यातून एकदा बैठक घ्यावी, असा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे.

हेही वाचा : पिंपरी महापालिकेत बढत्यांचा धमाका, एकाच दिवशी ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांना बढत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समितीमध्ये कोण?

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराट अध्यक्ष, सदस्य म्हणून शहर अभियंता मकरंद निकम, स्थापत्य, विद्युत, पाणी पुरवठा, उद्यान, जलःनिसारण विभागाचे सह शहर अभियंता, नगररचना विभागाचे उपसंचालक, कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त, आरोग्य कार्यकारी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी आदींचा समावेश आहे. क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते हे सदस्य सचिव असून, कक्ष अधिकारी असणार आहेत.