पिंपरी : मोटारीच्या छतावर बसून ‘स्टंटबाजी’ करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. मोटार जप्त करत या कारवाईचे छायाचित्र आणि चित्रफीत पोलिसांनी समाजमाध्यमावर टाकून ‘बक्षीस’ असे म्हटले आहे.

प्रतिक सुशिल शिंगटे (वय २४), ओमकार कृष्णा मुंढे (वय २०, दोघे रा. निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक योगेश गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पिंपरी : मराठा आंदोलकांनी किवळेत रस्ता रोखला

प्रतिक हा चिकन आणि वडापाव सेंटर चालवितो. तर, ओमकार हा निगडीतील पोलीस वसाहतीमध्ये राहत आहे. दोघेही गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये वेगाने मोटार चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे हा मोटार चालवत होता. तर, मुंढे हा मोटारीच्या छतावर बसून स्टंटबाजी करत होता. रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशी परस्थिती निर्माण झाली होती. या दोघांनी चालविलेल्या स्टंटबाजीची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. पोलिसांनी या दोन्ही तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची मोटारही जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – “भाजपाने नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले”, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईची माहिती टाकली ‘एक्स’वर

मोटारीमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकाराची माहिती समाजमाध्यमातील ‘एक्स’ खात्यावर टाकली. स्टंटटबाजीची चित्रफीत आणि कारवाईनंतरचे छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केले. त्याच्याखाली ‘बक्षीस’ असे लिहिले आहे.