दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी केली जप्त; तिघांना ठोकल्या बेड्या

पिंपरी- चिंचवडमध्ये पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. दिलीप प्रेमनारायण तिवारी, चंदनकुमार राय आणि सुगन कुमार राय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी, दिलीप तिवारीवर वसई येथे चार जणांची हत्या आणि दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हें दाखल आहेत. दुहेरी हत्ये प्रकरणी (डबल मर्डर) दुहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून तो कोविड काळात पॅरोलवर बाहेर आला असून पुन्हा जेलमध्ये गेलाच नाही. अखेर त्याच्या मुसक्या भोसरी पोलिसांनी आवळल्या आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी: डिलिव्हरीकरिता सोसायटीत जायचा आणि सायकली चोरून ‘ओएलएक्स’वर विकायचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात अज्ञात तीन व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दोन जिवंत काडतुसे आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आले. दरम्यान, तीन जणांपैकी आरोपी दिलीप प्रेम नारायण तिवारी हा कुख्यात सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वसई येथे चार जणांची हत्या आणि दोन जणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. संबंधित आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. परंतु, कोविडमुळे तो पॅरोलवर बाहेर आला होता, तो पुन्हा जेलमध्ये गेलाच नाही. तो पिस्तुल विक्री करायचा, अखेर त्याच्या मुसक्या भोसरी पोलिसांनी आवळल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस कर्मचारी राकेश बोईने, सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडिक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुषमा पाटील यांच्या टीमने केली आहे