शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला होता. भोसरीमधील कर्तृत्ववान व्यक्तीचे लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल असल्याचे विधान केल्याने एकच चर्चा रंगली होती. यावरून आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर देत कोल्हे यांनी लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल माझं असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेल, असे आव्हान आमदार महेश लांडगे यांनी अमोल कोल्हे यांना दिलं आहे. बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा टोला देखील त्यांनी कोल्हे यांना लगावला आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महेश लांडगे म्हणाले, अमोल कोल्हे यांच्या आरोपात काही तथ्य नाही. सुसंस्कृत नेत्यांकडून असे आरोप होणं योग्य नाही. पुढे ते म्हणाले, माझ्या शहरातील व्यक्ती लंडनमध्ये व्यवसाय करत असेल तर अभिमान आहे. जर त्यांचा रोख माझ्याकडे असेल तर अमोल कोल्हे यांनी तसे पुरावे सादर करावेत. माझे हॉटेल असल्याचं आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईल. खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करू नये. अमोल कोल्हे हे सुज्ञ आहेत. सुशिक्षित आहेत. कुणाच्या सांगण्यावरून आरोप करू नयेत. पुढे ते म्हणाले, १४०० कोटींचा डीपीआर केला आहे. इंद्रायणी नदी प्रकल्पावर आत्तापर्यंत कधीच खर्च झाला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. खर्च झाल्याचा आरोप केला असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. अतिहुशार व्यक्तीचे ऐकून ते आरोप करत आहेत, ही बालिशबुद्धी आहे, असा टोला आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले, पहिलवान ३६५ दिवस तयारी करत असतो. कधीही कुस्ती लागली की लढण्याची तयारी असते. निवडणुकीसाठी मी तयार आहे. महायुतीमध्ये उमेदवार ठरलेला नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – अजित पवार असे का म्हणाले, देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले होते?

“इंद्रायणी नदीवर १४०० कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही सहा महिन्याला एकदा इंद्रायणी नदी फेसळलेली कशी दिसते?”. “भोसरीमध्ये काहीजण कर्तृत्ववान माणसं आहेत. हे मी खर बोलत आहे. लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल कुठल्या तरी भोसरीमधील व्यक्तीचे, असे कानावर आलेलं आहे”.