पिंपरी- चिंचवड: बारणेंना कुणीतरी सांगा माझं अवघं कुटुंब राजकारणी आहे. मला पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सर्वजण ओळखतात. तरी देखील ते मान्य करत नसतील तर बारणेंनी अभ्यास करावा. मगच माझ्यावर बोलावं असं सडेतोड प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिलं आहे. संजोग वाघेरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा : भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विरोधकांना पराभव दिसत असल्याने अशी वक्तव्य करत आहेत, अशी टीका केली होती. तसंच बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं. यावर पुन्हा एकदा संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणेंवर निशाणा साधत प्रतिउत्तर दिलं आहे. वाघेरे म्हणाले, बारणेंना सांगा, माझी पत्नी तीन वेळा निवडून आलेली आहे. मी महापौर होतो, माझे वडील महापौर होते. या गावचे ते सरपंच ही होते. हे सर्व बघता बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर वाघेरे यांनी बारणेंना दिलं आहे. यावर आता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे काय उत्तर देतात हे बघावं लागेल. दिवसेंदिवस वाघेरे आणि बारणे यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु, दोघांपैकी खासदार म्हणून कोणाला मावळची जनता निवडून देणार हे येणारा काळ ठरवेल.