पिंपरी : ‘विना वाहन वापर’ धोरणाची अंमलबजावणी करून नागरिकांसाठी सायकल, पादचारी मार्गाला पूरक सुविधा पुरविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांनी पारितोषिक स्वीकारले. सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद २०२३ साठी शहरी वाहतूक विभागांमध्ये नावीन्यपूर्ण विषयांवर काम करणाऱ्या महापालिका, मेट्रो कार्पोरेशन, बस कार्पोरेशनकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. यासाठी पिंपरी महापालिकेने विना वाहन वापर धोरण तसेच त्या अनुषंगाने केलेल्या कामांचा समावेश होता. त्यामध्ये पिंपळे सौदागर परिसर, सांगवी-किवळे रस्ता, नाशिक-फाटा, वाकड रस्त्यावरील सायकल मार्ग तसेच पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविल्याबाबतची माहिती सादर करण्यात आली होती. देशभरातील अनेक शहरांमधून आलेल्या प्रवेशिकांमधून पिंपरी-चिंचवड शहराची निवड होऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरित करण्यात आले.

हेही वाचा – मौजमजेसाठी महागड्या सायकलींची चोरी करणारे उच्चशिक्षित दाम्पत्य गजाआड… अशी करायचे चोरी

हेही वाचा – राज्यातील तापमानात वाढ, तीन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहनमुक्त रस्ते, ज्ञानाची देवाणघेवाण अशा विविध उपक्रमांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यात येत आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने ‘रेस टू झिरो’ मोहिमेसाठी महापालिकेने ‘विना वाहन वापर’ योजना अंमलात आणली. शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सायकल, पादचारी मार्गाला पूरक सुविधा पुरविण्यासाठी भर देत आहोत. – शेखर सिंह, आयुक्त