पिंपरी- चिंचवड : पिंपरी कॅम्पमध्ये गळ्यातील सोन्याची सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार केल्याने अज्ञात चोरट्याने तरुणाच्या पायावर गोळी झाडल्याची घटना घडली. दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी कॅम्पमध्ये ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावेश काकराणी असं जखमी तरुणाचं नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, भावेश किराणा दुकानाच्या बाहेर बसला होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोनसाखळी खेचून घेत असताना भावेशने प्रतिकार केल्याने पायावर गोळी झाडली आहे. घटनेमध्ये भावेश जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अज्ञात चोरटा फरार झाला आहे. घटनेमुळे पिंपरी कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक युनिट दाखल झाल आहे. ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला तिथं सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. इतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नेमका हा गोळीबार प्रतिकार केल्याने केला आहे का? किंवा इतर काही कारण आहे?. याचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत.
“पिंपरी कॅम्पमध्ये दुपारी दीडच्या सुमारास तरुणाच्या पायावर गोळीबार करण्यात आला आहे. अद्याप कारण अस्पष्ट आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात पाठवल आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.” – अशोक कडलग- वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.