poha price hike in retail market zws 70 | Loksatta

कच्च्या मालाचा तुटवडा; पोहे महागले

उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मिल चालकांनी दरात वाढ केली आहे. घाऊक आणि बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे.

poha price hike in retail market
घाऊक बाजारात पोह्यांच्या क्विंटलच्या दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

पुणे : सामान्यांचा नाश्ता महाग झाला असून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोह्यांच्या दरात किलोमागे सरासरी तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली असून कच्च्या मालाच्या तुटवडय़ामुळे दरवाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारात कच्च्या मालाचा (धान किंवा साळ) तुटवडा जाणवत आहे. पोह्यांचे उत्पादन गुजरात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठय़ा प्रमाणावर केले जाते. कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने तेथील उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांनी (मिल) दरात वाढ केली आहे. जोपर्यंत कच्चा माल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता मार्केट यार्डातील व्यापारी सुमित गुंदेचा यांनी व्यक्त केली.

घाऊक बाजारात पोह्यांच्या क्विंटलच्या दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यंतरी तांदळाची निर्यात बंद करण्यात आली होती. केंद्र शासनाने तांदळावरील निर्यात बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या तांदळाची निर्यात मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या साळीचा तुटवडा जाणवत आहे. पोह्याला ग्राहकांकडून बारा महिने मागणी असते. साळीचे भाव वाढल्याने पोह्यांवर प्रक्रिया करणाऱ्या मिल चालकांनी दरात वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मिल चालकांनी दरात वाढ केली आहे. घाऊक आणि बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. जोपर्यंत साळीचे दर कमी होणार नाहीत. तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत राहतील, असे गुंदेचा यांनी नमूद केले.

किरकोळ बाजारात पोह्यांचे किलोचे दर

साधे पोहे-        ४५ ते ४८ रुपये

पातळ पोहे-       ५४ ते ५८ रुपये

दगडी पोहे-       ४२ ते ४५ रुपये

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 05:28 IST
Next Story
‘तिकडे राम मंदिर आणि इथे तुकाराम मंदिर होणारच’ एकनाथ शिंदेंची ग्वाही; म्हणाले “वारकऱ्यांच्या भावनेला…”