पुणे : औंध परिसरातील पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. अनिल सुजान काळे (वय १९, रा. माऊली पेट्रोल पंपामागे, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी काळे याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोटार परिवहन विभागातील पोलीस कर्मचारी अंकुश केंडे यांनी चतु:शृंगी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. औंध परिसरात पोलिसांचा मोटार परिवहन विभाग आहे. या विभागाकडून पोलीस दलात वापरल्या जाणाऱ्या वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. काळे आणि साथीदार मोटार परिवहन विभागात शिरले. दोघांनी जिन्यासाठी वापरले जाणारे स्टीलचे पाइप चोरले. पाइप चोरून मोटार परिवहन विभागातून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या काळेला पोलिसांनी पकडले. त्याच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला. पोलीस कर्मचारी वाईकर तपास करत आहेत.