पुणे : कात्रज भागातील सराफी पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीनांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. कात्रज गावार शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून कोयते, तसेच दुचाकी, मिरची पूड जप्त करण्यात आली.

याप्रकरणी यश रोहीदास बोरकर (वय १८), प्रसाद राजू कांबळे (वय १९), आर्यन दत्तात्रय काळे (वय १८, रा. अंजनीनगर, गणेश कॉलनी, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी चेतन गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कात्रज गावातील गणेश मित्र मंडळाजवळ टोळके थांबले असून त्यांच्याकडे कोयता, पालघन अशी शस्त्रे असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले.

हेही वाचा…सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडी, दीड लाखांचे परदेशी चलन चोरीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्याकडून कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकी जप्त केली आहे. त्यांच्याबरोबर असलेले तिघे जण पसार झाले. आरोपींचे साथीदार अल्पवयीन असून, त्यापैकी एकाविरुद्ध खुनाचा गु्न्हा यापूवी दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.