पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर शुक्रवारी रात्री भरारी पथकाला एक लाख ७० हजार रुपये आणि कमळ चिन्ह असलेली मतदार स्लिप व नावांची यादी सापडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास तांबे शाळेजवळ हा प्रकार उघडकीस आला.

माधव मल्लिकार्जुन मणोरे (वय ५१, रा. रहाटणी), स्वप्नील सुरेश फुगे (वय ३५, रा. फुगेवाडी) आणि कृष्णा बालाजी माने (वय २४, रा. फुगेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भरारी पथक प्रमुख विकास वारभुवन यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी सांगता झाली. त्यानंतर छुप्या प्रचाराला वेग आला. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मत मागण्याचे प्रकार घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात २४ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. भरारी पथकेदेखील नेमली आहेत.

हेही वाचा – अमोल कोल्हेंनी नागपूरात वाजवलेली “शिट्टी” चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ठरु शकते डोकेदुखी

हेही वाचा – पुणे: वेश्याव्यवसायाचा आरोप करुन खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रहाटणी येथील तांबे शाळेजवळ काहीजण पैसे घेऊन आल्याची माहिती भरारी पथकाला शुक्रवारी रात्री मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने कारवाई केली असता त्यात एक लाख ७० हजार रुपये रोख रक्कम, कमळ चिन्ह असलेली मतदार स्लिप व नावाची यादी मिळून आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.