पुणे : वॉरंट बजावण्यात आल्यानंतर अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. शरद दशरथ कणसे असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरोधात कोलकाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी वॉरंट बजावले आहे. संबंधित वॉरंटबजावण्यासाठी उपनिरीक्षक शरद कणसे याला देण्यात आले होते. यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी कणसेने २५ हजार रुपयांची लाच मागितली. सुरवातीला ५ हजार रुपये त्याने घेतले. त्यानंतर उर्वरीत २० हजार रुपयांसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावून अटक करण्याची धमकी दिली.

आणखी वाचा-पुणे : पाच दुकाने फोडून दीड लाख लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराने तक्रार दिली. त्यानंतर सापळा लावून कणसेला लाच घेताना पकडले. याप्रकरणी कणसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अमोल भोसले तपास करत आहेत.