राज्यापाल भगसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (मंगळवार) निषेध करण्यात आला. शिवस्मारक, एच. ए. कॉलनी गेट, पिंपरी कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. तसेच राज्यपालांसह भाजपा आणि त्रिवेदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा- “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणे, हे…”; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका
भाजपाच्या नेत्यांना योग्य बुद्धिमत्तेची प्रचिती यावी. स्मरणशक्ती वाढावी, बुद्धी कौशल्य वाढावे, यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने राज्यपाल कौशल यांना च्यवनप्राश पाठवण्यात येणार आहे. अस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- पुणे: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासाठी पदांच्या निर्मितीला मान्यता; वेतनाची जबाबदारी विद्यापीठावरच
काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले की, वारंवार पुरोगामी महाराष्ट्राची ओळख प्राप्त करून दिलेल्या महापुरुषांचा अवमान आणि इतिहासाची मोडतोड करून चुकीची वक्तव्य केली जात आहे. यामुळे समाजामध्ये अराजकता माजण्याची स्थिती आहे. राज्यपाल या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीची वक्तव्य करणे गैर आहे अतिशय चुकीचा संदेश या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या अशा वक्तव्यातून नागरिकांमध्ये जाऊन व असंतोष निर्माण होत आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कोश्यारी यांनी केलेल्या व्यक्तव्याची कीव येते. त्यांच्या बुद्धी वरच प्रश्नचिन्ह उभा राहिल असे वक्तव्य त्यांनी स्वतःच केलेले आहे.