पुणे : साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कवयित्री प्रतिभा पवार यांच्या ‘ती अजून जिवंत आहे…’ या संवेदना प्रकाशनाच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, प्रकाशक नितीन हिरवे, संदीप पवार आणि कविता पवार आदी या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात या कवितासंग्रहातील कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम धनंजय तडवळकर, सुनीता टिल्लू, ऋचा कर्वे, तनुजा चव्हाण, संदीप पवार आणि प्रतिभा पवार यांनी सादर केला. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीताराजे पवार म्हणाल्या, ‘हजारो वर्षांपासून कष्ट उपसणाऱ्या स्त्रीच्या दुःखाची जाणीव आजही समाजाला झालेली नाही. केवळ शिक्षणाने समाज सुधारणार नाही. तर, स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. कविता हे कवीचे आत्मचरित्र असते. कविता एकांतात स्वतःशी, समाजाशी आणि समस्त सहवेदना भोगणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधत असते.’