पुणे : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना समन्स बजाविण्यात आले. जबाब नोंदविण्यासाठी त्यांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. दोनवेळा समन्स बजावूनही खेडकर शनिवारी सायंकाळपर्यंत जबाब नोंदविण्यसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.

प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशिममध्ये छळवणुकीची तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने खेडकर यांनी पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. खेडकर यांना समन्स बजाविण्यात आले होते. खेडकर यांना समन्स बजाविण्यात आल्यानंतर त्यांनी दोन दिवसांचा अवधी पुणे पोलिसांकडे मागितला हाेता. शनिवारी सायंकाळी त्या पुण्यात येतील, अशी शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत खेडकर पुण्यात आल्या नाहीत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – “आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”, आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद

खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांची वाशिम पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात जिल्हाधिकारी दिवसे यांनी छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली. याप्रकरणी पोलिसांनी खेडकर यांना दोनवेळा समन्स बजाविले. समन्स बजाविल्यानंतर त्या जबाब नोंदविण्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत आल्या नाहीत.

हेही वाचा – अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ सूचनेचे केले कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेडकर यांनी सादर केलेले दृष्टीदोष प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला सादर केले होते. आई-वडिलांचे नाव, स्वाक्षरी, ईमेल, पत्ता बदलून फसवणूक केल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार अल्याचे लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले.