तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेली आणि पालिकेचा कर थकविल्याबद्दल वादग्रस्त कंपनी थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेडला महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने सील ठाेकले आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेच्या दोन लाख ७७ हजार रुपयांच्या कराची थकबाकी आहे.

तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातली सर्व कागदपत्रे तपासली आहेत.

हेही वाचा – आरटीई प्रवेशांबाबत सरकारला दणका, निकालावर याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

हेही वाचा – पुणे : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला; चिरडून तीन जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीमार्फत २००९ पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर २०२२ मध्ये भरण्यात आला. त्यानंतर कर भरला नाही. कंपनीने दोन लाख ७७ हजार ७८१ रुपयांचा कर थकविला आहे. त्यामुळे नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आली. कारवाईवेळी प्रशासन अधिकारी नाना माेरे, एल. एम काळे संबंधित गटलिपिक, एमएसएफ जवान उपस्थित हाेते.