पुणे : शासनमान्यतेशिवाय शाळा सुरू करून विद्यार्थी, तसेच पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटी संचालित ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष, संचालक, तसेच मुख्याध्यापिकेविरुद्ध काेंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शिक्षण विभागातील अधिकारी ज्ञानदेव आबाजी खोसे (वय ५५, रा. श्रीगणेश सोसायटी, वाघोली) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ

हेही वाचा – Puja khedkar : पुणे पोलिसांच्या दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल उंड्री संस्थेचे अध्यक्ष जे. डिकोस्टा (रा. बंगळुरू), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर), तसेच मुख्याध्यापिका अनिता नायर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षण विभागाच्या नियम आणि अटींची पूर्तता न करता कोंढवा परिसरातील उंड्री येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल चालविण्यात येत होती. या शाळेत पहिली ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. शाळेला शासनाची मान्यता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. पालकांकडून शैक्षणिक शुल्क घेतले. विद्यार्थ्यांचे दाखले, तसेच शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे खोसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.