लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांची पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा छोटा राजनशी संबंध असल्याच्या संशयावरून गुरुवारी ही चौकशी करण्यात आली.

आणखी वाचा-“पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले, त्यामुळेच…”; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरेंद्र अगरवाल यांना गुरुवारी पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावले होते. कुख्यात छोटा राजनसोबत असलेल्या संबंधाच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अगरवाल यांची चौकशी करण्यात आली. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अगरवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. सुरेंद्र आणि विशाल अगरवाल यांनी मुलाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले होते का, पोलिसांची काही मदत घेतली का किंवा कोणत्या मोठ्या व्यक्तीची मदत घेतली का, याचीदेखील चौकशी केली जात आहे.