पुणे : देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (११ सप्टेंबर) शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास गर्दी होते. गुरुवारपासून (११ सप्टेंबर) शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष केंद्र; प्रथमच अशी व्यवस्था

वाहतुकीस बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ काॅमर्स ते हिराबाग चौक)

वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते पुढीलप्रमाणे- सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ)

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडचे पाणी मुरतेय कुठे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहने लावण्यास मनाई

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, , मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.