पुणे : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेली वाढ आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीप बंगला चौक येथे आंदोलन झाले. प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट, लता राजगुरू, अजित दरेकर, मनिष आनंद, वैशाली मराठे, नीता रजपूत, संगिता तिवारी, पुजा आनंद यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकारने सर्व सामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविण्याची सुपारी घेतली असून आधीच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना घरगुती गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढवून नागरिकांच्या त्रासात भर टाकली आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात असून केवळ जाहिरातबाजी, सरकार पाडण्यात आणि ते सत्ता टिकविण्यात मश्गुल आहे.