पुणे : मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या एकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हरिदास बाळासाहेब टकले (वय २६) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. टकले याने अल्पवयीन युवतीला मदत करण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढले. टकले याने तिला आळंदी आणि कोल्हापूर परिसरात नेले. तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी टकलेला अटक केली. आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. सुचित्रा नरोटे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित युवतीचे वडील, भाऊ तसेच लाॅज व्यवस्थापकाची साक्ष महत्त्वाची ठरली.

हेही वाचा – अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर उदयनराजे आणि संभाजी राजेंनी भूमिका मांडावी; हिंदू महासंघाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी टकले आणि युवती ओळखीचे आहेत. टकले विवाहित असून त्याने युवतीला मदत करण्याचा बहाणा केला आणि तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. नरोटे यांनी केली. न्यायलयाने साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित युवतीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.