भरधाव मोटारीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानावर आदळून दोन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना सासवड-कापूरहोळ रस्त्यावर घडली. अपघातात मोटारीतील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.रचित मोहोता (वय १८, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल), आणि गौरव ललवानी (वय १९,रा. रायपूर, छत्तीसगड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

हेही वाचा >>> समाजमाध्यमावरील ओळख महागात ,उच्चशिक्षित महिलेची तीन लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ललवानी, मोहोता कोथरुडमधील एमआयटी संस्थेत शिकतात. मोहोतो, ललवानी आणि पाच मित्र मोटारीतून सोमवारी सायंकाळी सासवड-कापूरहोळ रस्त्याने जात होते. त्या वेळी नारायणपूर परिसरात भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आदळली.
अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, उपनिरीक्षक विजय झिंजुर्के यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान मोहोेता, ललवानी यांचा मृत्यू झाला