शिक्रापूर-चाकण मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने पुणे-नगर महामार्गावर सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर २१ ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान वाहतूक बदल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी दिली.

हेही वाचा >>>‘अर्थाचा अनर्थ’ झाला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली सांभाळण्यात व्यग्र; जयंत पाटील संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापूर या गावांच्या परिसरात गोदामे, शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालये, रुग्णालये तसेच औद्योगिक वसाहती आहेत. चाकण-रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर नगर महामार्गाचा वापर करतात. रांजणगाव, चाकण औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर कंपनीतील बसची वर्दळ असते. या भागातील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या भागात गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. २१ ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान सकाळी आणि सायंकाळी चार तास अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी कळविले आहे.