पिंपरी-चिंचवडमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी आरोपी दिनेश ठोंबरे याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या कटात दिनेशची पत्नी पल्लवी दिनेश ठोंबरे आणि मेहुना अविनाश टिळे हे देखील सहभागी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. त्यांना देखील वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश ठोंबरे आणि खून झालेली जयश्री गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना अडीच वर्षाचा ‘शिव’ नावाचा मुलगा देखील आहे. जयश्री गेल्या काही दिवसांपासून वेगळं राहायचं तगादा लावत होती. सतत पैशाची मागणी करत होती. जयश्रीला दिनेशच्या पत्नीसोबत भेटून बोलायचं म्हणत होती. अखेर २४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी रात्री नऊच्या सुमारास दिनेशची पत्नी पल्लवी आणि जयश्री अडीच वर्षीय मुलासह भुमकर चौकात भेटले. दरम्यान, भर रस्त्यावर जयश्रीने प्रियकर दिनेशशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद चारचाकी गाडीत बसून मिटवण्याचा दिनेशने प्रयत्न केला. परंतु, प्रेयसी जयश्री मोरे ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रियकर दिनेश ठोंबरे याने पत्नी आणि अडीच वर्षीय शिव समोरच प्रेयसीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली.

हेही वाचा – G D Madgulkar Award : आशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नी पल्लवीने मेहुणा अविनाश टिळेला फोन करून बोलवून घेतलं. दिनेश आपल्या पत्नी, मेहुणा आणि अडीच वर्षीय शिवसह चारचाकी गाडीतून साताऱ्यातील खंबाटकी घाटात गेले. त्या ठिकाणी जयश्री मोरेचा मृतदेह फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबर रोजी अडीच वर्षीय शिवला आरोपी दिनेश ठोंबरे आणि पल्लवीने आळंदीतील कार्तिकी यात्रेत बेवारस सोडून दिलं. दरम्यान, शिव पोलिसांना सापडला आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस येण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा – सराइतांकडून १४ लाखांच्या मेफेड्रोनसह पिस्तूल जप्त, शुक्रवार पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जयश्री मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली आणि ती बेपत्ता असल्याचा बनाव दिनेशने रचला. परंतु, काही तासांनीच जयश्री मोरेचा मृतदेह साताऱ्यातील पोलिसांना मिळाला आणि दिनेशचे बिंग फुटलं. वाकड पोलिसांना हे सर्व प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी दिनेश ठोंबरे यांच्यासह पत्नी पल्लवी ठोंबरे आणि मेहुना अविनाश टिळे याला अटक केली.