पुण्यामध्ये शॉक लागून एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. क्लासवरून घरी चाललेल्या चार वर्षाच्या मुलास रस्त्याच्या कडेला पडलेल्या वायरचा शॉक लागला. विजेचा हा झटका इतका गंभीर होता की या मुलाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसतेय.

शहनाज अमीर सय्यद असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील स्पार्क मिठानगर नवजीवन पार्क गल्ली क्रमांक १० परिसरात शहनाज अमीर सय्यद हा चार वर्षाचा मुलगा राहत होता. तो क्लास करून घरी जात असताना, पावसाळी लाईनचे काम चालू सुरू होते. यामुळे रस्ता खोदलेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याच्याकडेला एमएसईबीची वायर तुटून पडली होती. त्या तुटून पडलेल्या वायरचा झटका शहनाज अमीर सय्यदला बसला. शॉक लागल्याने तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.